बडतर्फ IAS पूजा खेडकर यांना बांधून ठेवलं... आई-वडिलांना बेशुद्ध केलं...

Share:
Main Image
Last updated: 11-Jan-2026

पुणे, (प्रतिनिधी) ११ जानेवारी - प्रशिक्षण काळात विविध वादांमुळे चर्चेत राहिलेल्या आणि अलीकडेच सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांच्या पुण्याच्या निवासस्थानी रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. त्यांच्या घरात नव्याने कामावर ठेवलेल्या एका नेपाळी नोकराने खेडकर कुटुंबीयांना ओलीस ठेवून लूटमार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

घटनेचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नेपाळी नोकराने पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना काहीतरी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्याने पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तूंची पळवापळवी केली.

काय काय चोरीला गेले?
या लुटीमध्ये नोकराने खेडकर कुटुंबीयांचे मोबाईल फोन आणि घरातील इतर काही मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला आहे. या अजब चोरीमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नुकताच कामावर ठेवलेला हा नोकर कोण होता? त्याची पार्श्वभूमी काय होती? आणि त्याने हे कृत्य कोणाच्या मदतीने केले का, याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

पुणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. बडतर्फ अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्या घरात अशा प्रकारे घुसून झालेली ही चोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments

No comments yet.