येत्या सोमवारी सर्वांना घ्यावी लागणार ही शपथ... जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 10-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० जानेवारी - बालविवाह मुक्त भारत/महाराष्ट्र- आपला संकल्प १०० दिवस अभियानांतर्गत जिल्ह्यात सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी वाजता एकाच वेळी बालविवाह प्रतिबंधांची प्रतिज्ञाा घेण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. 

जिल्ह्यात बालविवाह मुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही प्रतिज्ञा घेण्यात येईल. सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी रुग्णालये, धार्मिकस्थळे, मंगल कार्यालये, विवाह सेवा पुरवठादार, बॅण्ड पथके, बसस्थानक, रेल्वे स्थानक, पोलिस ठाणे, मॉल, दुकाने, हॉटेल, उपाहारगृहे, बचत गट, महिला मंडळ, स्वयंसेवी संस्था, मित्रमंडळ आदींनी बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच महिलांविरुद्ध होणारी हिंसा नष्ट व्हावी यासाठी देखील प्रतिज्ञा घ्यावी. त्यानंतर सर्व संबंधितांनी याबाबतची माहिती http://forms.gle/xbEfs5TGccSKGm१९ या लिंकमध्ये भरावी. 

बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा

बालविवाह ही एक सामाजिक कुप्रथा असून कायद्याचे उल्लंघन आहे. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, सुरक्षिततेवर, आरोग्यावर आणि सर्वांगीण विकासावर गंभीर परिणाम होतो व त्यांच्या स्वप्नांची पूर्तता होण्यास अडथळा निर्माण करते. 
म्हणूनच मी प्रतिज्ञा करतो/करिते की,

* बालविवाह रोखण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन
* माझ्या कुटुंबात, नातेवाईकात व समाजात बालविवाह होणार नाही याची मी दक्षता घेईन
* बालविवाहाचा कोणताही प्रयत्न आढळल्यास तो चाइल्ड हेल्प लाइन १०९८ यावर व संबंधित यंत्रणेला कळवीन.
* सर्व बालकांच्या शिक्षणासाठी, सुरक्षिततेसाठी आणि हक्कांसाठी मी माझा आवाज उठवीन व बालविवाह मुक्त भारत घडविण्यासाठी पाठिंबा देईन
* तसेच मी प्रतिज्ञा करितो/करिते की महिला व मुलींवरील छळ व अन्याय यांना समर्थन देणार नाही
* स्त्री भ्रूण हत्या होऊ देणार नाही
* मी प्रतिज्ञा करितो/करिते की, महिलांवरील अत्याचार/अन्याय आढळून आल्यास महिला हेल्पलाइन क्रमांक १८१ यावर कळवीन
* महिलांसाठी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेन.

जयहिंद…जय महाराष्ट्र

Comments

No comments yet.