मुंबई, (प्रतिनिधी) १० जानेवारी - टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने आज १.५ लिटर हायपेरियन टर्बो-जीडीआय पेट्रोल इंजिनवर चालणाऱ्या हॅरियर आणि सफारी या त्यांच्या बहुप्रतीक्षित गाड्यांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. या किंमती त्यांच्या सेगमेन्टमध्ये स्पर्धात्मक आहेत. हॅरियर पेट्रोलची सुरुवात १२.८९ लाख रु. (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) पासून होत असून सफारी पेट्रोल १३.२९ लाख रु. (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) पासून उपलब्ध आहे.
उच्च सेगमेन्टमधील लक्झरी फीचर्सने सुसज्ज असलेल्या या दोन्ही एसयूव्ही प्रीमियम एसयूव्हीची नव्याने व्याख्या करतात. यात सॅमसंग निओ क्यूएलईडीवर चालणारा ३६.९ सेंमी सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट डिस्प्ले, आकर्षक डॉल्बी ऍटमॉस ऑडिओ, बिल्ट-इन ड्युअल डॅश कॅम आणि डीव्हीआरसह व्हिजन-एक्स इ- आयआरव्हीएम, ऑटो रिव्हर्स डिपसह व्हिजनसिंक मेमरी ओआरव्हीएम आणि क्लिअरव्ह्यू ड्युअल कॅमेरा वॉशर यांसारखी अत्याधुनिक इनोव्हेशन समाविष्ट आहेत.
या सेगमेन्टमध्ये सर्वोत्तम इंधन-कार्यक्षमता प्रदान करण्याव्यतिरिक्त, यातील संपूर्ण नवीन १.५ लिटर हायपेरियन टर्बो-जीडीआय इंजिनमध्ये बुद्धिमान टेक्नॉलॉजी ठासून भरली आहे, ज्यामुळे हॅरियर आणि सफारी प्रीमियम एसयूव्ही सेगमेन्टची नव्याने व्याख्या करतात. लेटेस्ट इंजिन टेक्नॉलॉजी आणि एआय व एमएलवर चालणारे इंजिन अतुलनीय आणि निर्दोष परफॉर्मन्स देते आणि शहरातील तसेच महामार्गांवरील प्रवासादरम्यान शक्ती आणि कार्यक्षमता यांचा उत्तम समतोल साधते. या गाड्या उत्कृष्ट राईड आणि हँडलिंग प्रदान करतात, सेगमेन्टमधील सर्वोत्तम एनव्हीएच स्तरासह प्रीमियम केबिन शांतता सुनिश्चित करतात आणि त्यातील पॉवरट्रेन अशाप्रकारे ट्यून करण्यात आली आहे की, गाडी शहरातील वाहतुकीत स्मूद चालते आणि उच्च वेगात देखील उत्तम स्थिरता कायम ठेवते. एकंदरित, या गुणांमुळे प्रत्येक प्रवास सुखद होतो. हे गुण हॅरियर आणि सफारीला या सेगमेन्टमधील सर्वोत्तम पर्याय म्हणून स्थापित करतात.
हॅरियर आणि सफारीने टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडची सुरक्षिततेची परंपरा जपत आता हायपेरियन पेट्रोल इंजिन असलेल्या सर्व व्हेरियन्ट्स साठी परफेक्ट ५-स्टार भारत एनसीएपी रेटिंग मिळवले आहे. त्यामुळे हॅरियर आणि सफारीचा संपूर्ण पोर्टफोलियो ५ स्टार प्रमाणित झाला आहे.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवास्तव म्हणाले, “२.५ लाखापेक्षा जास्त हॅरियर आणि सफारी आत्ता मार्केटमध्ये आहेत. या दोन्ही एसयूव्हीनी आधीच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सची डिझाईन, परफॉर्मन्स आणि सुरक्षिततेच्या परंपरेचे प्रतीक म्हणून स्थान मिळवले आहे. संपूर्ण नवीन १.५ लिटर हायपेरियन टर्बो-जीडीआय पेट्रोल इंजिन या वाहनांची गुणवत्ता आणखी वाढवते. हॅरियर पहिल्यापासून आपला डायनॅमिक स्टान्स आणि उठून दिसणाऱ्या रूपामुळे एक आयकॉनिक एसयूव्ही म्हणून ओळखली जाते. आता हायपेरियनची अतुलनीय पॉवर आणि प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभव यामुळे हॅरियर आणखी प्रभावी झाली आहे. दुसरीकडे, सफारीने लोकांची आवडती आणि प्रतिष्ठित हाय एसयूव्ही म्हणून या उद्योगात आपले बस्तान बसवले आहे. सफारीची ही मजबूत परंपरा आता हायपेरियनच्या शांत, आवाज न करणाऱ्या आणि टेक्नॉलॉजीने समृद्ध परफॉर्मन्समुळे अधिक मजबूत झाली आहे.
हा हायपरएफिशन्ट पॉवरट्रेन या सेगमेन्टमधील सर्वोत्तम इंधन-कार्यक्षमता, अतुलनीय परफॉर्मन्स, प्रीमियम रिफाईनमेंट आणि स्मूदनेस प्रदान करतो. जो एसयूव्हीच्या बोल्ड डिझाईन आणि प्रगत इनोव्हेशन बरोबरच सेगमेन्ट मधील सर्वोत्तम इन-केबिन तंत्रज्ञानाला पूरक आहे. हॅरियर आणि सफारी पेट्रोल एकत्रितपणे, लक्झरी इतकेचे बुद्धिमत्तेला महत्व देणाऱ्या आधुनिक भारतीय ग्राहकासाठी तयार करण्यात आल्या आहेत.”