अल्पवयीन बालिकेला निर्वस्त्र केले... वाल्मीक मंदिर परिसरातील घटना...

Share:
Last updated: 07-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ जानेवारी - पैशांचे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार द्वारका भागातील वडाळानाका रोड परिसरात घडला. या घटनेची दखल पोलीसांनी संशयितांस तात्काळ अटक केली असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृषभ धरमपाल चव्हाण (२२ रा.वडाळानाका रोड द्वारका) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीतेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. पिडीता मंगळवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास आपल्या घर परिसरात रस्त्याने पायी जात असतांना परिचीत असलेल्या संशयिताने वाल्मिक मंदिर भागात तिची वाट अडविली. यावेळी वीस रुपये देत संशयिताने तिला अडगळीच्या ठिकाणी घेवून जात निर्वस्त्र करून तिचा विनयभंग केला. मुलीने घरी येवून आपबिती कथन केल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली असून संशयितास अटक करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

आर्थिक वादातून घर पेटवले

नाशिक : आर्थिक वादातून जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताने १ कोटी ८० लाख रूपयांच्या खंडणीसाठी पेटवून घेण्याची धमकी देत वाहने व घरावर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन गुवणंतराव पाटी (३७ रा.इम्पोरिओ हाईटस, क्रिकेट ग्राऊंड जवळ महात्मानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत चार्टड अकाऊंटट असलेल्या रूची सुराणा (रा.जुना आग्रारोड) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित हा सुराणा यांच्या पतीचा मित्र असून दोघा मित्रांमध्ये आर्थीक व्यवहार होते. 

सुराणा यांच्या पतीने संशयिताशी असलेले आर्थिक व्यवहार पूर्ण केले असतांना तो काही दिवसांपासून कुटूंबियास त्रास देत आहे. कोणतेही देणे नसतांना गेल्या १३ सप्टेंबर रोजी संशयिताने राज पवार नामक इसमामार्फत १ कोटी ८० लाख रूपयांच्या खंडणीची वेळोवेळी मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास घरासमोर येवून स्व:तासह सुराणा यांच्या पतीस पेटवून देण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. सोमवारी (दि.५) संशयिताने मध्यरात्रीच्या सुमारास सुराणा यांच्या कुटूंबियाच्या जीवितास धोका होईल या उद्देशाने इमारतीच्या आवारात लावलेल्या वाहनांना व इमारतीला आग लावून पेटवून दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

नाशिक : बसमध्ये चढतांना वृद्धेच्या गळ्यातील साडे तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हातोहात लांबविले. ही घटना ठक्कर बाजार बसस्थानक आवारात घडली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शकुंतला विष्णू कोरडे (६५ रा. श्रीरामवाडी,घोटी ता.इगतपुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कोरडे गेल्या ३१ डिसेंबर रोजी शहरात आल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. इगतपुरी नाशिक या बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ४० हजार रूपये किमतीचे व ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबविले. तपास हवालदार मुर्तडक करीत आहेत.

Comments

No comments yet.