जळगाव, (प्रतिनिधी) ७ जानेवारी - जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना कळविण्यात येते की, शासनाच्या 10 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंडळ अधिकारी कार्यालयांचे बळकटीकरण करण्यासाठी तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी खात्रीशीर संपर्क होण्यासाठी आठवड्यातील एक दिवस सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी मंडळ अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी आदेश पारित केले असून त्याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.jalgaon.gov.in येथे प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये कळविले आहे.