इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा या तारखेला होणार...

Share:
Main Image
Last updated: 07-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ जानेवारी - राज्यात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

शासनमान्य शाळांमधून 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व सातवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी 2 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा कालावधी देण्यात आला असून विलंब, अतिविलंब आणि अति विशेष विलंब शुल्कासह 28 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, असे परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.