...म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात... प्रभाग ३ चे उमेदवार अंबादास खैरे यांनी स्पष्टच सांगून टाकलं...

Share:
Main Image
Last updated: 06-Jan-2026

 

प्रभाग क्रमांक ३ मधील माता, भगिनी आणि बांधवांना आदरपूर्वक नमस्कार,


मी अंबादास हिराबाई जगन्नाथ खैरे, प्रभाग ३ मधून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक आहे. आपण सर्वजण मला खुप चांगल्या पद्धतीने जाणताच. गेल्या पंधरा वर्षांपासून मी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे.

माननीय कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. छगनरावजी भुजबळ साहेब, माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक श्री. समीर भुजबळ, आमदार श्री. पंकज भुजबळ, माझे ज्येष्ठ बंधू आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस श्री. दिलीप खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून मी युवकांसाठी सर्वतोपरी योगदान देत आहे. त्याचबरोबर त्रिमुर्ती नगर सांस्कृतिक, कला, क्रीडा व मंडळ, क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती, मदत फाऊंडेशन, छगनरावजी भुजबळ साहेब पतसंस्था यांच्या माध्यमातून माझे बहुविध प्रकारचे कार्य सुरूच आहे.


कोविडचा संकटकाळ अतिशय आव्हानात्मक होता. मात्र, त्यावेळी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून कुठलाही हात आखडता न घेता मी अहोरात्र केल्याचे आपल्या स्मरणात असेलच. भुजबळ कोविड सेंटर मध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, रुग्णांना तेथे बेड मिळावेत, उपचार मिळावेत, घरात क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा,कोविडमुक्तीसाठी मारुती मंदिर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू केले. त्याद्वारे परिसरातील दहा हजाराहून अधिक जणांनी कोविडची लस घेतली.कोविड काळात लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. अशा तीन हजाराहून अधिक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. जनसेवेची प्रचंड आवड असल्यानेच आपल्या परिसरातील विविध समस्या ओळखून त्या तातडीने सुटाव्यात यासाठी महापालिका किंवा संबंधित विभागाला निवेदन देणे आणिवेळेप्रसंगी आंदोलन करणेसुरूच असते. आपला परिसर सुरक्षित रहावा यासाठी गणेशवाडी देवी मंदिर परिसर आपण सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आणला आहे. त्याचा मोठा फायदा होत आहे. पोलिसांनीही त्याचे कौतुक केले आहे. 


महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर आपल्या परिसरातील महिलांना त्याचा लाभ मिळावा यासाठी विशेष मोहिम हाती घेतली. त्याद्वारेच माझ्या संपर्क कार्यालयातून ३५०० हून अधिक महिलांचे अर्ज आपण ऑनलाईन भरुन दिले. तसेच, सर्व महिलांचे केवायसी सुद्धा केले. या महिलांच्या खात्यात दरमहा पैसे जमा होतील यासाठी ठोस पाठपुरावा केला. त्यात उल्लेखनीय यश आले.गणेशोत्सवाच्या काळात मंडळांद्वारे जनजागृती, प्रबोधन, स्पर्धा आणि विविध उपक्रम राबविण्यात कुठेच खंड पडलेला नाही. महाराष्ट्राचे आऱाध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचवटी भागातील जन्मोत्सव सोहळा संपूर्ण शहरात चर्चेचा ठरतो.

युवकांच्या उत्साह आणि शक्तीला चालना मिळावी म्हणून प्रभाग प्रिमीयर लीग दरवर्षी भरवून टर्फ क्रिकेट स्पर्धा घेतल्या जातात. याद्वारेविजेत्या व उपविजेत्या संघाला रोख बक्षिस व सन्मानचिन्ह दिले जाते. सहभागी संघांनाही स्मृतीचिन्ह देवून गौरविले जाते. क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने भव्य देखावे, चित्ररथ, ढोलताशे आदींद्वारे देखणी मिरवणूक आयोजित केली जाते.त्यासाठी समाजाच्या सर्व घटकातील संघटना आणि व्यक्तींना एकत्र आणले जाते. आपल्याय परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न असो की धूर फवारणीसह अन्य कार्य सतत आपल्या सर्वांच्या संपर्कात राहून सेवा देण्याचा मी प्रयत्न करतो आहे.

 
विकासकामांची दूरदृष्टी, संघटनकौशल्य, नेतृत्व क्षमता आदींच्या जोरावर प्रभाग तीनचे प्रतिनिधीत्व मी महापालिकेत करावे, अशी आग्रही मागणी आपणा सर्वांकडून सातत्याने होत आहे. या आशिर्वादरुपी आग्रह आणि प्रेमाचा अव्हेर मी कसा करु शकतो? म्हणूनच मी यंदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून इच्छुक आहे. माझ्या सारख्या सामान्य उमेदवाराला आपण नक्की संधी द्याल, यात मला तिळमात्र शंका नाही. महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत सैनिक म्हणून मी आपल्याला आश्वस्त करू एच्छितो की, आपल्या सर्वांच्या सेवेत नेहमीच उभा राहून नाशिकच्या विकास कार्यात योगदान देणार आहे.सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवा आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा सकुशल संपन्न व्हावा हेच माझे ध्येय आहे. 


प्रभाग तीनशी माझी नाळ जोडलेली असल्याने येथील समस्या-अडीअडचणी मला प्रकर्षाने माहित आहेत. त्या सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न आवश्यक आहेत. विविध समाज आणि क्षेत्रातील घटकांना न्याय मिळेल, यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांनी मला संधी दिली तर सर्वप्रथम प्रभागाच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे माझ्या विचाराधीन आहे. तसेच, अतिशय दर्जेदार आणि जनतेच्या दैनंदिन जीवनातील अडथळे दूर करणारी विकासकामे करण्याचा माझा निश्चय आहे. त्यासाठीच आपल्या प्रभागाचा विकास संकल्प मी आपल्या समोर ठेवत आहे. त्यास आपण मनापासून दाद द्याल अशी खात्री आहे. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या निशाणी समोरील बटण दाबून आपण मला विजयी करावे, ही नम्र विनंती.    


-    अंबादास हिराबाई जगन्नाथ खैरे
उमेदवार, प्रभाग क्रमांक ३ (ड), नाशिक महापालिका

Comments

No comments yet.