मुंबई, (प्रतिनिधी) ५ जानेवारी - किया इंडियाने ऑल-न्यू किया सेल्टोसच्या किमतींची घोषणा केली, ज्यासह मिड-एसयूव्ही श्रेणीमध्ये आपले स्थान प्रबळ केले आहे आणि ग्राहकांना त्यांची आवडती एसयूव्ही 10.99* लाख रूपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होणाऱ्या किमतीमध्ये खरेदी करण्याची आकर्षक संधी दिली आहे.
अधिकाधिक ग्राहकांसाठी सेकंड-जनरेशन, अधिक मोठी, अधिक आकर्षक आणि अधिक प्रगत एसयूव्ही परवडणारी करत कियाने मापदंड उंचावत या श्रेणीला नव्या उंचीवर नेले आहे. ऑल-न्यू किया सेल्टोसने भारतातील आधुनिक कुटुंबांसाठी आणि एसयूव्ही ग्राहकांसाठी सर्वात परिपूर्ण व लक्षवेधक निवड म्हणून आपले स्थान अधिक प्रबळ केले आहे. या एसयूव्हीमध्ये एैसपैस जागा, आकर्षक नवीन डिझाइन, सुरक्षितता व तंत्रज्ञान आहे, तसेच ही एसयूव्ही आकर्षक दरामध्ये येते.
किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्वांगू ली म्हणाले, ''ऑल-न्यू किया सेल्टोस ब्रँड सेल्टोसच्या प्रबळ उत्क्रांतीची प्रतीक आहे, जेथे ब्रँडने भारतातील कियाच्या प्रवासाला आकार दिला आहे. या नवीन जनरेशनमधून आमचा एैसपैस जागा, सुरक्षितता, तंत्रज्ञान व एकूण मालकीहक्क अनुभवामधील मानक उंचावत आणि ग्राहकांना अपवादात्मक मूल्य देत मिड-एसयूव्ही श्रेणीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा मनसुबा आहे. हा धोरणात्मक दृष्टिकोन आमच्या स्पर्धात्मकता क्षमतेला अधिक प्रबळ करतो, ब्रँडप्रती ग्राहकांचा आत्मविश्वास अधिक दृढ करतो आणि कियाला भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण एसयूव्ही श्रेणीमध्ये गती व मार्केट शेअर कायम ठेवण्यास प्रबळपणे स्थित करतो. आपल्या BADASS वारसाशी बांधील राहत ऑल-न्यू सेल्टोसमधून भारतातील आधुनिक कुटुंबांसाठी डिझाइन करण्यात आलेली उत्तमरित्या सुसज्ज, फ्यूचर-रेडी एसयूव्ही देण्याप्रती आमची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते.''
कियाच्या अनंतपूर प्लांटमध्ये ऑल-न्यू किया सेल्टोसचे उत्पादन सुरू झाले आहे, तसेच किमतीच्या घोषणेसह ग्राहक या एसयूव्हीचे मालक बनण्याच्या जवळ पोहोचले आहे, ज्याला उत्तमरित्या नियोजित उत्पादन व डिलिव्हरी सुविधेचे पाठबळ आहे.
कियाच्या सर्वात प्रीमियम व वैशिष्ट्य-संपन्न व्हेरिएण्ट्सचे भाग जीटीएक्स(ए) व एक्स लाइन(ए) ट्रिम्समध्ये सुधारित प्रगत वैशिष्ट्यांसह खाली देण्यात आलेली सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली एसयूव्ही
ऑल-न्यू किया सेल्टोस आपली प्रबळ छाप निर्माण करण्यास सज्ज आहे, जेथे विभागातील अग्रणी ४,४६० मिमी लांबी, सुधारित १,८३० रूंदी आणि २,६९० मिमी लांब व्हीलबेससह ही एसयूव्ही रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते, तसेच केबिनमध्ये एैसपैस जागा देते. आकर्षक एक्स्टीरिअरमधून कियाचे ऑपोझिट्स युनायटेड डिझाइन तत्त्व दिसून येते. या वेईकलमध्ये नवीन डिजिटल टायगर फेस, विभागातील प्रथम ऑटोमॅटिक स्ट्रीमलाइन डोअर हँडल्स आणि डायनॅमिक वेलकम फंक्शनसह आइस क्यूब एलईडी प्रोजेक्शन हेडलॅम्प्स आहेत. आकर्षक आर१८ (४६.२ सेमी) स्पोर्टी क्रिस्टल कट अलॉई व्हील्ससह निऑन ब्रेक कॅलिपर्स, इंटीग्रेटेड रिअर स्पॉयलरसह हिडन रिअर वायपरमधून आधुनिक सिल्हूट दिसून येते, ज्यासह आत्मविश्वासपूर्ण व आधुनिक एसयूव्ही दर्जा निर्माण होतो.
या आकर्षक नवीन डिझाइनसह ऑल-न्यू किया सेल्टोस १० मोनोटोन रंग पर्याय, तसेच मॉर्निंग हेझ व मॅग्मा रेड या दोन नवीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
प्रीमियम, तंत्रज्ञान-केंद्रित केबिन
आतील बाजूस, ऑल-न्यू किया सेल्टोस सर्वोत्तम केबिन अनुभव देते, जेथे विभागातील सर्वोत्तम ७५.१८ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेलसोबत डबल डी-कट ड्युअल टोन लेदरेट-रॅप्ड स्टीअरिंग व्हील, सर्वोत्तम प्रीमियम बोस ८-स्पीकर ऑडिओ सिस्टम अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. प्रगत तंत्रज्ञान परिसंस्था प्रत्येक ड्राइव्हला आरामदायी व उत्साहवर्धक करते, ज्यामध्ये विभागातील प्रथम स्मार्ट की प्रोक्झिमिटी अनलॉक फंक्शन सारखी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे सुलभ सुविधा मिळतात. तसेच वायरलेस अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कारप्ले विनाव्यत्यय, वायरलेस डिजिटल अनुभव देते.
आरामदायी वैशिष्ट्ये जसे विभागातील प्रथम १०-वे पॉवर ड्रायव्हर सीटसह पॉवर लम्बर अॅडजस्ट व सर्वोत्तम रिलॅक्सेशन फंक्शनसह ओआरव्हीएम सेटिंग्जसोबत कनेक्टेड इंटीग्रेटेड मेमरी ड्रायव्हर सीट, पुढील बाजूस हवेशीर सीट्स वेलकम रिट्रॅक्ट सीट फंक्शन आणि ड्युअल पेन पॅनोरॅमिक सनरूफ यासह इतर सर्वोत्तम वैशिष्ट्ये दैनंदिन ड्रायव्हिंग आणि लांब अंतरापर्यंचा प्रवास आरामदायी व उत्साहवर्धक करतात.
प्रगत सुरक्षितता व इंटेलिजण्ट ड्राइव्ह
ऑल-न्यू सेल्टोसमध्ये कियाचा जागतिक के३ प्लॅटफॉर्म आहे, जो या कारच्या माध्यमातून भारतात पदार्पण करत आहे. या प्लॅटफॉर्मच्या प्रगत आर्किटेक्चरमुळे एसयूव्हीची प्रबळ रचना, आरामदायी राइड आणि ड्रायव्हिंगमध्ये सुधारणा झाली आहे, तसेच उत्तम नॉईज इन्सुलेशन व स्थिरतेची खात्री मिळते. प्रबळ २४ स्टॅण्डर्ड सेफ्टी पॅकसह सुरक्षितता अधिक वाढवण्यात आली आहे, याव्यतिरिक्त या वेईकलमध्ये ६ एअरबॅग्ज, अॅण्टी-लॉक ब्रेक सिस्टम (एबीएस), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (एचएसी) अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांसोबत २१ ऑटोनॉमस वैशिष्ट्ये असलेले लेव्हल-२ एडीएएस आहे. यामुळे विविध ड्रायव्हिंग स्थितींमध्ये प्रगत ड्रायव्हर असिस्टण्स, आत्मविश्वासपूर्ण व आनंददायी ड्रायव्हिंगची खात्री मिळते.
शक्ती आणि पर्याय
ऑल-न्यू किया सेल्टोस विविध पॉवरट्रेन लाइनअपसह येते, ज्यामध्ये स्मार्टस्ट्रीम जी१.५ पेट्रोल, स्मार्टस्ट्रीम जी१.५ टी-जीडीआय पेट्रोल व १.५ लिटर सीआरडीआय व्हीजीटी डिझेल इंजिनचा समावेश आहे, तसेच ६एमटी, ६आयएमटी, आयव्हीटी, ७डीसीटी व ६एटी असे विविध ट्रान्समिशन पर्याय आहेत. चार प्रमाणित ट्रिम्स एचटीई, एचटीके, एचटीएक्स व जीटीएक्स/एक्स-लाइनमध्ये उपलब्ध असलेली ऑल-न्यू किया सेल्टोस चार पर्यायी पॅक्स एचटीई(ओ), एचटीके(ओ), एचटीएक्स(ए) आणि जीटीएक्स(ए)/एक्स-लाइन(ए) मध्ये येते. याव्यतिरिक्त कन्वीनियन्स व स्टायलिंग, प्रीमियम, एडीएएस व एक्स लाइन, प्रत्येक ग्राहकांच्या गरजांनुसार डिझाइन करण्यात आलेले डिझाइन पॅकेजेस् आहेत.
सर्वोत्तम मालकीहक्क अनुभव
किया इंडियाने पारदर्शक व त्रासमुक्त मालकीहक्क अनुभव देत विक्रीपलीकडे आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. मायकिया अॅप सुलभ सर्विस बुकिंग्ज, किमतींबाबत स्पष्ट अंदाज, लाइव्ह समुपदेशन व किया किस्टलच्या माध्यमातून सर्विस स्ट्रिमिंग देते. प्रळ, पारदर्शक डिलन नेटवर्क आणि ग्राहक-केंद्रित सर्वोत्तम मालकीहक्क उपक्रम जसे जवळपास ७ वर्षांपर्यंत एक्स्टेण्डेड वॉरंटी, माय कन्वीनियन्स वैयक्तिकृत सर्विस प्लॅन्स व जवळपास ८ वर्षांपर्यंत रोडसाइड असिस्टण्स यासह किया श्रेणीमध्ये समाधान आणि सर्वात स्पर्धात्मक किफायतशीर मालकीहक्क अनुभव देते.
किया इंडियाच्या अत्याधुनिक अनंतपूर प्लांटमध्ये उत्पादित करण्यात आलेली ऑल-न्यू सेल्टोस झपाट्याने विकसित होत असलेल्या मिड-एसयूव्ही श्रेणीमध्ये कियाचे स्थान अधिक प्रबळ करते. आकर्षक किंमत आणि सर्वसमावेशक पॅकेजसह ऑल-न्यू सेल्टोस श्रेणीमध्ये धुमाकूळ निर्माण करण्यास, ग्राहकांकडून मागणी वाढवण्यास आणि भारतातील या श्रेणीमध्ये कियाचे नेतृत्व अधिक प्रबळ करण्यास सज्ज आहे.
आपल्या प्रबळ मूल्य तत्त्वाला अधिक दृढ करत कियाने खात्री घेतली आहे की ऑल-न्यू किया सेल्टोस बेस व्हेरिएण्ट्सपासून सर्वोत्तम वैशिष्ट्ये देईल, ज्यामुळे ग्राहकांना अधिक आरामदायीपणा, सुरक्षितता व तंत्रज्ञान मिळेल. ही सुविधा ग्राहकांना मूल्य, कार्यक्षमता, तंत्रज्ञान किंवा डिझाइनसंदर्भात सर्वोत्तम व्हेरिएण्ट पर्यायाची निवड करण्यास सक्षम करते, तसेच ऑल-न्यू किया सेल्टोस लाइन-अपमधील सर्वोत्तम एसयूव्ही असण्याची खात्री देते.
किया इंडियाचे ३६९ शहरांमधील ८२१ टचपॉइण्ट्सचे व्यापक नेटवर्क देशभरातील ग्राहकांसाठी ऑल-न्यू सेल्टोसला अधिक सहजपणे उपलब्ध करून देते, ज्यामधून मेट्रो व उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये सहजपणे विक्री, सर्विस व मालकीहक्क पाठिंब्याची खात्री मिळते.
~ किंमत 10.99* लाख रूपयांपासून, भारतातील मिड-एसयूव्ही श्रेणीमधील मापदंडांना नव्या उंचीवर नेले ~
· अधिक मोठी, अधिक आकर्षक आणि अधिक प्रगत असलेली ऑल-न्यू किया सेल्टोस आता सर्व व्हेरिएण्ट्समध्ये अपवादात्मक मूल्य प्रदान करण्यासाठी योग्य किमतीत उपलब्ध आहे.
· व्यापक व्हेरिएण्ट भारतातील कुटुंबांना आणि एसयूव्ही ग्राहकांना लक्षवेधक पर्याय देते.
· ऑल-न्यू सेल्टोसने झपाट्याने विकसित होत असलेल्या मिड-एसयूव्ही श्रेणीमध्ये कियाचे नेतृत्व अधिक प्रबळ केले आहे.
· लक्षवेधक उपस्थिती: विभागातील अग्रणी ४,४६० मिमी लांबी, सुधारित १,८३० मिमी रूंदी आणि २,६९० मिमी लांब व्हीलबेस आहे.
· आकर्षक नवीन डिझाइन: कियाच्या ऑपोझिट्स युनायटेड डिझाइन तत्त्वाला दाखवते, तसेच नवीन किया डिजिटल टायगर फेस, विभागातील प्रथम ऑटोमॅटिक स्ट्रीमलाइन डोअर हँडल्स आणि डायनॅमिक वेलकम फंक्शनसह आइस क्यूब एलईडी प्रोजेक्शन हेडलॅम्प्स अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
· नेक्स्ट-जनरेशन डिजिटल अनुभव: विभागातील सर्वोत्तम ७५.१८ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेल आणि कारमध्ये उत्तम मनोरंजनासाठी सर्वोत्तम प्रीमियम बोस ८-स्पीकर ऑडिओ आहे.
· फ्यूचर-रेडी टेक: अधिक सोयीसुविधेसाठी वायरलेस अँड्रॉईड ऑटो व ऍप्पल कार प्ले आणि विभागातील प्रथम स्मार्ट की प्रोक्झिमिटी अनलॉक फंक्शन अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
· नवीन प्लॅटफॉर्म: भारतातील पहिलाच कियाचा जागतिक के३ प्लॅटफॉर्म ऑल-न्यू सेल्टोसमधील सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग आरामदायीपणा वाढवतो.
· प्रगत सुरक्षितता आणि इंटेलिजण्ट ड्राइव्ह: प्रगत सुरक्षितता आणि नियंत्रणासाठी २१ ऑटोनॉमस वैशिष्ट्ये असलेले एडीएएस लेव्हल २ आणि प्रबळ २४ स्टॅण्डर्ड सेफ्टी पॅक आहे.
· प्रत्येक ड्रायव्हरसाठी आरामदायीपणा: विभागातील प्रथम १०-वे पॉवर ड्रायव्हर सीटसह मेमरी फंक्शन ,ओआरव्हीएम) व रिलॅक्सेशन मोड, पुढील बाजूस हवेशीर सीट्स, वेलकम रिट्रॅक्ट सीट फंक्शन.
· सर्वांसाठी ट्रिम पर्याय: चार बेस ट्रिम्स एचटीई, एचटीके, एचटीएक्स व जीटीएक्स आणि चार पर्यायी पॅक्स - कन्वीनियन्स, प्रीमियम, एडीएस आणि एक्स लाइन, प्रत्येक ग्राहकाच्या गरजांनुसार डिझाइन करण्यात आलेले डिझाइन पॅकेजेस्.
· स्मार्टस्ट्रीम जी१.५ पेट्रोल व स्मार्टस्ट्रीम जी१.५ टी-जीडीआय पेट्रोल आणि १.५ लीटर सीआरडीआय व्हीजीटी इंजिन्सची शक्ती, तसेच दैनंदिन ड्रायव्हिंग शैलीसाठी विविध ट्रान्समिशन पर्याय - ६एमटी, ६आयएमटी, आयव्हीटी, ७डीसीटी आणि ६एटी