नाशिक, (प्रतिनिधी) ४ जानेवारी - गेल्या वर्षी जून, जुलैत झालेल्या ऑनलाइन सीईई परीक्षेतील शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची शारीरिक चाचण्या, वैद्यकीय तपासणी व कागदपत्रांची पडताळणी ३० जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. भारतीय सैन्यामध्ये होणारी भरती प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक आहे. यामध्ये कुठल्याही स्तरावर पैशांची देवाण-घेवाण होत नाही. भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी कुठल्याही दलालांची आवश्यकता नाही. दलाल किंवा कुठलीही मध्यस्थ व्यक्ती सैन्यामध्ये भरती करू शकत नाही.
कुणीही व्यक्ती किंवा दलाल सैन्यात भरतीसाठी पैसे किंवा अन्य वस्तूंची मागणी करीत असेल, तर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक (दूरध्वनी : ०२५३- २९७०७५५, व्हॉटस ॲप : ९४२१४- ९८१३९) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल विलास सोनवणे (नि.) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.