अल्पवयीन विवाहितेने दिला बाळास जन्म... पंचवटी पोलिसांनी...

Share:
Last updated: 03-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ जानेवारी - अल्पवयीन विवाहीता प्रसूत होवून तिने गोंडस मुलास जन्म दिला आहे. पिडीता अल्पवयीन असल्याने या घटनेची दखल घेण्यात आली असून पंचवटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी सदर विवाहीतेच्या पती विरोधात बालविवाहासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम साळुंखे (२८ रा.पेठनाका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. याबाबत हवालदार अनिल सोर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. संशयिताने पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही २५ मार्च २०२५ रोजी गंगाघाटावरील मोदकेश्वर मंदिरात विवाह केला होता. या काळात मुलगी गर्भवती राहिली होती. प्रसुत कळा सुरू झाल्याने तिला आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरूवारी (दि.१) रात्री तिने गोंडस बाळाला जन्म दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.

Comments

No comments yet.