नाशिक जिल्ह्यातील या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांची देशभर चर्चा...

Share:
Main Image
Last updated: 03-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ जानेवारी - जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय स्तरावरील 'एनक्यूएएस' (NQAS) मानांकन प्राप्त झाले आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील दोन 'आयुष्मान आरोग्य मंदिर' - प्राथमिक आरोग्य केंद्रांना केंद्र सरकारचे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) प्रमाणपत्र जाहीर झाले आहे.

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या 'राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्रा'द्वारे (NHSRC) नुकताच हा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील खालील दोन केंद्रांनी यश मिळवले आहे:

१. आयुष्मान आरोग्य मंदिर - प्राथमिक आरोग्य केंद्र, उसवाड, ता. चांदवड : या केंद्राने ९७.००% इतका उच्चांकी गुणांक मिळवून 'क्वालिटी सर्टिफाईड' मानांकन प्राप्त केले आहे.

२. आयुष्मान आरोग्य मंदिर - प्राथमिक आरोग्य केंद्र, जातेगाव, ता. नाशिक : या केंद्राने ९१.७५% गुण मिळवून राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

"नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. या मानांकनामुळे आरोग्य केंद्रांवरील जनतेचा विश्वास अधिक वृद्धिंगत होईल. या यशाचे श्रेय केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा गुणवत्ता कक्षाला जाते." : डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.

Comments

No comments yet.