नंदुरनाका येथे वाहन अपघातात एकाचा बळी... नाशकात रस्ते अपघात सुरूच...

Share:
Last updated: 01-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ जानेवारी - भरधाव दुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नांदुरनाका भागात झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शंकर उकडी ठोकळ (५५ रा. निशांत गार्डन जवळ धात्रक फाटा,आडगाव शिवार) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ठोकळ गेल्या शुक्रवारी (दि.१९) सकाळच्या सुमारास ओढ्याकडून जत्रा हॉटेलच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. 

छत्रपती संभाजी रोडवरील नांदुरनाका भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. परिसरातील खासगी रूग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. बुधवारी (दि.३१) उपचार सुरू असताना डॉ. आकाश पवार यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. तपास जमादार जाधव करत आहेत.

Comments

No comments yet.