येवला, (प्रतिनिधी) १ जानेवारी - येवला शहरातील नागरिकांना विकासनाम्याच्या माध्यमातून जी वचन आपण दिली आहे. त्या सर्व वाचनाची पूर्तता करण्यासाठी प्राधान्य असणार आहे. त्यादृष्टीने सर्व लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने ती पूर्ण करावी. तसेच येवला स्वच्छ सुंदर करून येवला शहराला विकासाच्या उंचीवर न्यावे असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचारक माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित येवला नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व नगरसेवकांचा पदग्रहण येवला नगरपालिकेत पार पडणार आहे. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून नगराध्यक्ष व नगसेवक नव्या कारकिर्दीची औपचारिक सुरुवात करण्यात आली. या सोहळ्यानंतर लगेचच संपूर्ण येवला शहरात स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, संभाजी पवार, वसंत पवार, भाजप नेते धनंजय कुलकर्णी, प्रमोद सस्कर, बंडू क्षीरसागर, शहर काझी सलोमोद्दीन मिसभाई, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, भोलानाथ लोणारी, राजश्री पहिलवान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ते राजेश भांडगे, दत्ता निकम, भाजप नेते मनोज दिवटे, मीनानाथ पवार, संजय बनकर, युवराज पाटोळे, सचिन कळमकर, यती गुजराथी,निसार लिंबुवाले, अमजद शेख, शफीक शेख, मुश्ताक शेख, सुहास भांबारे, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, गणपत कांदळकर, गुड्डू जावळे, संतोष खैरनार, नितीन गायकवाड, मच्छिंद्र थोरात, डॉ.प्रवीण बुल्हे, प्रवीण पहिलवान, मलिक मेंबर, अशोक संकलेचा, सुमित थोरात, सुनील जाधव, रवींद्र जगताप, सचिन सोनवणे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, उपमुख्याधिकारी चंद्रकांत भोये, रोहित पगार, नितीन आहेर, अश्विन पुंड, पूनम भामरे, यांच्यासह ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, येवला शहर हे स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. येणाऱ्या काळात रस्त्यासह विविध विकासाची कामे मार्गी लावायची आहे. विकासाची कामे करताना ती दर्जेदार व्हावी. विरोधकांचा देखील सन्मान ठेऊन त्यांची कामे प्राधान्याने करावी. संपूर्ण येवला शहरातील प्रश्न न्याय पूर्वक सोडवले जावे व मंत्री छगन भुजबळ यांचा विश्वास आपण सर्वांनी विकासातून सार्थ करावा असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रशासकीय संकुलासह विविध विकास कामे करण्यात आली आहे. शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. त्याचा पुढील टप्पा देखील मंजूर करून काम सुरू करण्यात येईल. येवला शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येसगाव येथून नवीन पाणी पुरवठा योजना राबवून पुढील पंचवीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल. कोपरगाव येवला मनमाड मालेगाव चौपदरी काँक्रिट रस्ता मंजूर करण्यात आला आहे. शहरातील काही नागरिकांची उड्डाणपुलाची मागणी आहे तर काही नागरिकांना बाह्य वळण रस्ता हवा आहे.सर्वांना विश्वासघात घेऊन लवकरच या रस्त्याच्या डीपीआरचे काम पूर्ण होऊन शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी सांगितले.
स्वच्छता मोहिमेतून येवला शहर होणार स्वच्छ सुंदर
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप मित्रपक्षांच्या वतीने वचननाम्यात स्वच्छ सुंदर येवला असा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार पदग्रहन सोहळा संपन्न होताच येवला शहरातील सेनापती तात्या टोपे स्मारक येथून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उद्या पासून संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व घनकचरा जेसीबी, ट्रॅक्टर, डम्परच्या सहायाने घनकचरा प्रकल्पात हलविण्यात येऊन येवला स्वच्छ सुंदर करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.