तिघे दुचाकीवर आले... अल्पवयीन मुलावर सपासप वार केले..

Share:
Last updated: 01-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ जानेवारी - घरासमोर शेकोटीजवळ बसलेल्या अल्पवयीन मुलास दुचाकीवर सोबत घेऊन जात तिघांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना सिन्नरफाटा भागात घडली. या घटनेत जीवे ठार मारण्याची धमकी देत १५ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 अमन शेख व त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत साहिल शमिम अन्सारी (रा.गजानन पार्क समोर, चेहडी पंपीग) या मुलाने फिर्याद दिली आहे, अन्सारी मंगळवारी (दि.३०) रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोर पेटविलेल्या शेकोटीजवळ बसला होता. 

दहा वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अमन शेख याने त्यास बळजबरीने दुचाकीवर डबलसीट बसवून नेत हा हल्ला केला. सिन्नर फाटा येथील उर्दु शाळा भागात अन्य दोन मित्रांकडे घेऊन जात अन्सारी यास टोळक्याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी पोलीसात तक्रार केली तर जीवे ठार मारू अशी धमकी देत अमन याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. या घटनेत अन्सारी जखमी झाला असून तपास हवालदार सानप करीत आहेत.

Comments

No comments yet.