नाशिक, (प्रतिनिधी) दि.१ जानेवारी:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुंबई नाका येथील स्मारकात अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ह्रदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मंत्री छगन भुजबळ हे जयंती उत्सवाच्या निमित्ताने अभिवादन करण्यास या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. त्यांच्या या नाशिक दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा संचारली आहे.
ह्रदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रथमच मंत्री छगन भुजबळ हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव जि.सातारा या जन्मगावी होणाऱ्या जयंतीउत्सव सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. नायगाव येथील कार्यक्रम झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे दुपारी २ वाजता नाशिकच्या मुंबई नाका येथील स्मारकात उपस्थित राहून अभिवादन करणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
शस्त्रक्रियेनंतर प्रथमच जनतेत येत असल्याने, हा दौरा पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नाशिक आणि येवला परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, महिला, युवक आणि विविध समाजघटकांनी भुजबळ साहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या होत्या. आज त्यांच्या सुदृढतेसह नाशिकमध्ये आगमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा संचारली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाच्या राजकारणाची दिशा सातत्याने जपली आहे. त्यांच्या याच विचारांची पुनर्पुष्टी या अभिवादनातून होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोहळा आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.