नाशकात महिलांच्या विनयभंगाचे प्रकार सुरूच...

Share:
Last updated: 01-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ जानेवारी - शहरात विनयभंगाचे प्रमाण वाढले असून वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातील एकीचा पाठलाग करीत तर दुसरीच्या फोटोचा गैरवापर करीत सोशल मिडीयावर विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी उपगर व सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उपनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रविण उर्फ निखील अरूण चौधरी (४०) या परिचिताने तिचा पाठलाग करीत विनयभंग केला. मंगळवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास पडीता परिसरातील किराणा दुकानात जात असतांना हा प्रकार घडला. उपनगर जागिंग ट्रॅक परिसरातील गांधी टीव्हीएस शोरूम भागात पाठलाग करीत आलेल्या संशयिताने महिलेची वाट अडवित विनयभंग केला.

यावेळी महिलेने त्यास दाद न दिल्याने त्याने किराणा दुकान गाठून तिला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास जमादार बकाल करीत आहेत. 

दुसऱ्या घटनेत पिडीतेच्या फोटोचा गैरवापर करीत भामट्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला. फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल साईडवर मार्च ते जून २०२५ दरम्यान हा प्रकार घडला असून
बनावट आयडीधारकांनी महिलेचे चारित्र्य हनन करण्याच्या उददेशाने हे कृत्य केले आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात विनयभंग व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक पिसे करीत आहेत.

Comments

No comments yet.