नाशिक, (प्रतिनिधी) १ जानेवारी - राज्यपाल आचार्य देवव्रत दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता ओझर विमानतळ, नाशिक येथे त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी 2.30 ते 4.30 वाजेपर्यंत सह्याद्री फार्म, मोहाडी, दिंडोरी येथे विविध कार्यक्रमास उपस्थित ते उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 4.30 ते 8.30 वाजेदरम्याने ते दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथे ‘प्रशासन गांव की और’, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आरोग्य शिबिर कार्यक्रम, ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमास उपस्थिती, शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथे आदिवासी मंत्री, सचिव (आदिवासी) व वनवासी कल्याण आश्रम समिती सदस्यांसोबत राखीव, तसेच आदिवासी संस्कृती परिचय घेत स्थानिक नागरिकांसोबत चावडी संवाद साधणार आहेत.
शुक्रवार 2 जानेवारी 2026 रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत सकाळी 7 ते 8.40 दरम्यान आदिवासी निवासी आश्रमशाळा पिंपरखेड येथील विद्यार्थ्यांसोबत योगा कार्यक्रमास उपस्थिती, विद्यार्थ्यांसोबत नाश्ता व संवाद, वेणूबाई देवराज या महिला शेतकरी यांच्या शेती कामात सहभागी होणार आहेत.
सकाळी 9 ते 9.30 वाजता दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथे शेतकरी संपत राऊत यांची नैसर्गिक शेती, जनवारांचे गोठे पाहणी, स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
सकाळी 11.10 ते 12.10 ओझर येथील विमान फॅक्टरीस भेट व कामगारांशी संवाद साधतील.