भोपाळ ते पुणे हॉट एअर बलूनिंग मोहिमेने रचला नवा विक्रम
Last updated: 15-Dec-2025
पुणे (प्रतिनिधी), १० डिसेंबर -
भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे या हॉट एअर बलूनिंग मोहिमेचे आज पुण्यात हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. भोपाळमधील ईएमई सेंटर येथील हॉट एअर बलूनिंग नोडने भारतीय लष्कराच्या साहसी विंगच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या मोहिमेला 30 नोव्हेंबर 2025 रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 750 किलोमीटरहून अधिक प्रवास करताना संघाने मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यापासून महाराष्ट्रातील पश्चिम घाटापर्यंत विविध भूप्रदेशांचा प्रवास केला आणि महू, संभाजी नगर तसेच अहिल्यानगर येथे नियोजित थांबे घेतले. प्रत्येक ठिकाणी संघाने स्थानिक तरुणांशी संवाद साधला, त्यांना या अनोख्या साहसी खेळाचे साक्षीदार होण्याची आणि शोध आणि लवचिकतेची भावना वाढवण्यासाठी भारतीय सैन्याच्या वचनबद्धतेबद्दल जाणून घेण्याची संधी दिली.
या मोहिमेचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे 8 तास 44 मिनिटांचे विक्रमी विना थांबा हॉट एअर बलून उड्डाण, ज्यामुळे त्याला भारतातील सर्वात जास्त कालावधीच्या हॉट एअर बलून उड्डाणाचा मान मिळून एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले. ही उल्लेखनीय कामगिरी संघाची अपवादात्मक व्यावसायिकता, सहनशक्ती, संघसामर्थ्य आणि विमानचालन उत्कृष्टतेसाठीचा ध्यास दर्शवते.
संपूर्ण मोहिमेदरम्यान चमूने विद्यार्थी आणि तरुण इच्छुकांशी सक्रियपणे संवाद साधला, साहसाला जीवनशैली म्हणून प्रोत्साहन दिले आणि सशस्त्र दलांमध्ये रस निर्माण केला. प्रेरक भाषणे, प्रात्यक्षिके आणि संपर्क कार्यक्रमांनी लष्करी जीवनाची व्याख्या करणाऱ्या धैर्य, शिस्त आणि संघकार्याच्या मूल्यांवर प्रकाश टाकला.
दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पीव्हीएसएम, एव्हीएसएम यांनी विक्रमी कामगिरीबद्दल संघाचे अभिनंदन केले आणि त्यांचा दृढनिश्चय, धैर्य आणि साहसी वृत्तीचे कौतुक केले. अशा अग्रगण्य उपक्रमांमुळे सैन्यातील साहसी संस्कृती बळकट होते आणि तरुणांशी जोडण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून काम करते, असे त्यांनी स्पष्ट केले
Comments
No comments yet.