पशुपालक शेतकऱ्यांनो, इकडे लक्ष द्या... तुम्हाला मिळेल इतक्या लाखांचे कर्ज सहज...

Share:
Main Image
Last updated: 31-Dec-2025

नंदुरबार, (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर - केंद्र शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय व संलग्न पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुग्ध व्यवसाय, पशुपालन, शेळी–मेंढी पालन, पोल्ट्री आदी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंत केवळ 7% व्याजदराने कर्ज मिळते. तसेच कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास 3% अतिरिक्त व्याज सवलत देण्यात येऊन प्रभावी व्याजदर फक्त 4% इतका राहतो. विशेष म्हणजे ₹3 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही तारण किंवा सुरक्षा आवश्यक नाही, विशेषतः दुग्धसंघाशी संलग्न शेतकऱ्यांसाठी ही मोठी सोय आहे.

या कर्जाचा उपयोग पशुधन खरेदी, चारा व वैरण, औषधे व उपचार, वीज, मजुरी तसेच दैनंदिन व्यवसायिक खर्चासाठी करता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यवसाय विस्तारासाठी आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते.

पात्रता:

दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, शेळी–मेंढी पालक, पोल्ट्री फार्मर्स तसेच दुग्ध उत्पादक कंपन्या किंवा सहकारी संस्थांशी संलग्न शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

अर्ज प्रक्रिया:

शेतकऱ्यांनी जवळच्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत (SBI, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक इ.) KCC साठी अर्ज करावा. अर्जासोबत आधार कार्ड, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा व पशुपालन/दुग्ध व्यवसायाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. बँक पडताळणीनंतर किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाईल.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी
संपर्क : डॉ. रमण गावित – 9422374630

ही योजना पशुपालक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा एक महत्त्वाचा आधार असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet.