नाशिक (प्रतिनिधी), दि. ३० डिसेंबर २०२५ - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 11, 26,28, 29, 31 या प्रभागामध्ये एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे सर्व उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म दिले.
त्यानुसार प्रभाग 11 मध्ये माजी नगरसेविका एड. वसुधा कराड, प्रभाग 26 मधून माजी नगरसेवक एड. तानाजी जायभावे, माजी नगरसेवक सचिन भोर,ज्योती सचिन घाटोळ, स्वप्न मच्छिंद्र माळी हे चार उमेदवार, प्रभाग 28 मधून एड.मनोज आहेर,प्रभाग 29 मधून संतोष मुरलीधर काकडे,प्रभाग 31 मधून आत्माराम डावरे व किरण राजभोज हे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
सध्या सुरू असलेल्या विश्वासघातकी,संधी साधू,स्वार्थी,दल बदलू राजकारणामुळे जनता कंटाळली आहे व त्यांना स्वच्छ राजकारण करणाऱ्या पर्यायाची आवश्यकता वाटत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गेले 30- 40 वर्ष तत्त्वनिष्ठ राजकारण करत आला आहे. 25 वर्षापेक्षा जास्त समाजसेवा केलेल्या कार्यकर्त्यांनाच पक्षाने या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. सतत कामगार कष्टकरी शेतकऱ्यांच्या बाजूने पक्ष संघर्ष करत आहे.नाशिक मधील जनता पक्षाला यशस्वी करेल असा विश्वास वाटतो, असे राज्य सचिव डॉ. डी एल कराड यांनी सांगितले आहे.