नाशिक मनपा निवडणुकीत 'आम आदमी पार्टी'ने रिंगणात उतरविले ३५ उमेदवार... बघा पूर्ण यादी..

Share:
Main Image
Last updated: 30-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) ३० डिसेंबर - आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी राजकीय वातावरण तापू लागले असून, 'आम आदमी पार्टी'ने (आप) आपली पहिली अधिकृत उमेदवारी यादी जाहीर करून निवडणुकीच्या रिंगणात आघाडी घेतली आहे. 'आप' नाशिक निवडणूक प्रचार समितीचे सचिव स्वप्नील घिया यांनी ही ३५ उमेदवारांची यादी अधिकृतरित्या प्रसिद्ध केली आहे.

या यादीमध्ये पक्षाने विविध प्रभागांतील निष्ठावान कार्यकर्ते आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ११ मधून समाधान अहिरे, प्रभाग २८ मधून राजू कुमावत आणि प्रभाग २६ मधून सुमित शर्मा यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. महिला प्रतिनिधीत्वावरही भर देण्यात आला असून नूतन कोरडे, आशा आस्वारे, ज्योती वेताळ आणि वंदना सोनवणे यांच्यासह अन्य महिला उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.

खालीलप्रमाणे 'आप'ने आपले उमेदवार निश्चित केले आहेत:


|1) समाधान रमेश अहिरे प्र.क्र. 11अ
2) राजू वाल्मीक कुमावत प्र.क्र. 28ड
3) सुमित संतोष शर्मा प्र.क्र. 26ड


4) सुरज पुरोहित प्र.क. 29ड
5) भूषण ज्ञानेश्वर पाटील प्र.क्र.10ड
6) कलविंदर गरेवाल प्रभाग क्र.23क
7) गिरीश उगले पाटील प्र. क्र. 18ड


8) अमर गांगुर्डे प्र क्र.15क
9)माजीद पठाण प्रभाग क्रमांक 23ड
10) दिपक दादू सरोदे प्र.क्र. 21.ड
11) चंद्रशेखर महानुभाव प्र.क्र.17ड


12) पवन अनिल बकुरे प्रभाग क्र.1क
13) आशा सतीश आस्वारे प्रभाग क्रमांक 27अ
14) प्रशांत खरे प्रभाग क्र.25ड
15)संजय कातकाडे प्रभाग क्र.12ड


16) नूतन कोरडे प्र. क्र.29अ
17) गोरख मोहिते प्रभाग क्र.12अ
18) रिजवान सुलतान सैय्यद प्रभाग क्रमांक 12क
19) रघुनाथ चौधरी प्रभाग क्र.24ड


20) शोभा चौधरी प्रभाग क्र.29ब 
21) शैलेंद्र सिंग प्रभाग क्रमांक 20ड


22)विजय अहिरे प्रभाग क्रमांक 11ड
23) ज्योती वेताळ प्रभाग क्र.25 ब 
24) कीर्ती नरेंन्द्र मुठे प्रभाग क्र.23अ 
25) पद्माकर अहिरे प्रभाग क्र.31ड 


26) वंदना सोनवणे प्रभाग क्र.4क
27)अविनाश निमकर प्रभाग क्र.27ब  
28)आशिष खंडीझोड प्र. क्र.31अ 
29)कैलास कडलग प्रभाग क्र.8ड


30)शामकुमार राजपूत प्र.क्र 20ड
31)मेहरीन पठाण प्रभाग क्र.19क
32)शाहरूख शेख प्रभाग क्र.24ड
33)राजेश दोंदे प्रभाग क्रमांक 27ड


34)योगेश कापसे प्र.क्रमांक 4ड
35)इम्रान तांबोळी प्रभाग क्र.13क


नाशिकच्या विकासासाठी आणि मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम आदमी पार्टी कंबर कसून तयार असल्याचे या यादीतून स्पष्ट होत आहे. लवकरच उर्वरित उमेदवारांची घोषणाही केली जाणार असल्याचे संकेत प्रचार समितीकडून देण्यात आले आहेत.

Comments

No comments yet.