नाशकात होणार भव्य होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो

Share:
Main Image
Last updated: 15-Dec-2025
नाशिक (प्रतिनिधी) दि. १० डिसेंबर – नरेडको नाशिक आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025 या नाशिकमधील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित गृहप्रदर्शनाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन आज डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड येथे मंत्रोच्चार व शुभसंकेतांत मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यानंतर एक्स्पोच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली असून नरेडकोचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते. नरेडको नाशिक आणि BSNL यांच्यात औपचारिकरित्या कम्युनिकेशन पार्टनर म्हणून करार करण्यात आला आहे. BSNL तर्फे एक्स्पो परिसरात मोफत वाय-फाय सहित विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सामाजिक बांधिलकी जपत, नरेडकोतर्फे काही निवडक समाजसेवी संस्थांना विनामूल्य स्टॉल देण्यात आले आहेत. यामध्ये आदिवासी विकास मंडळाच्या आदिवासी बांधवांकडून तयार केलेल्या *‘साबरी प्रॉडक्ट्स’*चा विशेष समावेश आहे. होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 18 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात येत असून, नाशिककरांसाठी घरखरेदी व गुंतवणुकीची सुवर्णसंधी ठरणार आहे. आगामी काही दिवसांत सहभागी प्रकल्प, आकर्षक ऑफर्स, विविध स्कीम्स आणि कार्यक्रमांची माहिती जाहीर करण्यात येणार आहे. नाशिकच्या विकासाचा नवा अध्याय ठरणाऱ्या या एक्स्पोकडे शहरवासीयांची उत्सुकता वाढत असून, या उपक्रमामुळे नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी गती मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित मान्यवर म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवकुमार आवळकंठे, BSNL चे महाप्रबंधक सारंग मांडवीकर, मा. अभय तातेड, दीपक बागड, नरेडको अध्यक्ष सुनील गावादे, शंतनु देशपांडे, समन्वयक अभय नेरकर, उदय शहा, खजिनदार भूषण महाजन, ॲड. अजय निकम, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले सदस्य भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेकर, अश्विन आव्हाड, मुकुंद साबु, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, शाम डेडिया, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनावणे, शशांक देशपांडे आदींचा विशेष सहभाग आहे.

Comments

No comments yet.