मुंबई हादरली! 'बेस्ट' बसने १३ जणांना चिरडले...

Share:
Main Image
Last updated: 30-Dec-2025

मुंबई, (प्रतिनिधी) ३० डिसेंबर - भांडूप परिसरात एका भरधाव 'बेस्ट' बसने (BEST Bus) १३ जणांना भीषण धडक दिली असून, या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण मुंबई हादरून गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस रिव्हर्स घेताना रात्रीच्या वेळी ही घटना घडली. तेव्हा रस्त्यावर वर्दळ होती. पादचारी आणि समोर येणाऱ्या वाहनांना ही बस चिरडत गेली. या भीषण अपघातात १३ जण बसच्या कचाट्यात आले. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जखमींची अवस्था गंभीर

या अपघातातील अन्य ९ जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.

अपघाताचे कारण अस्पष्ट

हा अपघात बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे झाला की चालकाचे नियंत्रण सुटल्याने, याचा तपास पोलीस करत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बसचा वेग जास्त होता आणि ती समोर येणाऱ्या प्रत्येकाला धडक देत ती पुढे जात होती.

Comments

No comments yet.