विजय मर्चंट स्पर्धेत नील चंद्रात्रेची अष्टपैलू कामगिरी

Share:
Main Image
Last updated: 29-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) २९ डिसेंबर - नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज आणि फलंदाज नील चंद्रात्रे याने  बीसीसीआयच्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या सौराष्ट्र व हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यांत उपयुक्त अष्टपैलू कामगिरीने दोन्ही विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. मुलापडू, आंध्र  येथे तीन दिवसीय कसोटी स्वरूपात एलिट गटात महाराष्ट्राचे साखळी सामने सुरू आहेत.

सौराष्ट्रविरुद्ध पहिल्या डावात नील चंद्रात्रेने  फलंदाजीत २६ धावा तर गोलंदाजीत पहिल्या डावात ३ व दुसऱ्या डावात १ बळी घेतला.
 
संक्षिप्त धावफलक व निकाल - महाराष्ट्र पहिला डाव ४१६ ( प्रज्वल मोरे १६५, नील चंद्रात्रे २६  ) वि.  सौराष्ट्र - पहिला डाव - १३२ - नील चंद्रात्रे व श्रेयस फडतरे प्रत्येकी ३ तर विश्वजीत जगताप व अर्जुन सोनार प्रत्येकी २ बळी व फॉलोऑन नंतर - दुसरा डाव -२०१ - श्रेयस फडतरे ५ , शौर्य देशमुख व अर्जुन सोनार प्रत्येकी २ तर नील चंद्रात्रे १ बळी.

महाराष्ट्र १ डाव व ८३ धावांनी विजयी.

त्यानंतर हिमाचल प्रदेश विरुद्ध नीलने पहिल्या डावात फलंदाजीत ३४ धावा तर गोलंदाजीत पहिल्या डावात १ बळी व दुसऱ्या डावात २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक व निकाल-  महाराष्ट्र पहिला डाव २३८ - (ओम पाटील ११०,नील चंद्रात्रे ३४ ) व दुसरा डाव -१ बाद २०६ ( एकनाथ देवडे १०२ व ओम पाटील नाबाद १०३) वि.

हिमाचल प्रदेश पहिला डाव १०२ – (श्रेयस फडतरे ५ , शिवम नीलकंठ ३ तर नील चंद्रात्रे व शौर्य देशमुख प्रत्येकी १ बळी )  व

दुसरा डाव -८१ – ( शौर्य देशमुख ४ तर नील चंद्रात्रे व विश्वजीत जगताप प्रत्येकी २ व  शिवम नीलकंठ १ बळी )

Comments

No comments yet.