नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी  संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर

Share:
Main Image
Last updated: 29-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) २९ डिसेंबर - नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी संघटना अध्यक्ष एकनाथ अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली लेवा पाटीदार भवन, गंगाघाट, पंचवटी येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषयपत्रिकेनुसार सभेची नोटीस, अहवाल वाचन, इतिवृत्त वाचन व  ताळेबंदासह  आर्थिक पत्रकांचे वाचन करून त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.

नवीन कार्यकारणीची सर्वसंमतीने निवड

सभेमध्ये नवीन कार्यकारणीची सर्व संमतीने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी संतोष राय, उपाध्यक्षपदी प्रभाकर गाडे, कार्याध्यक्षपदी महेंद्र अंबालाल पटेल, सचिव पदी अविनाश पाठक व सहसचिव पदी हेमचंद्र पांडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

लकी ड्रॉ व बक्षीस वितरण

सभेसाठी उपस्थित सभासदांपैकी  सहा भाग्यवंत सदस्यांना लकी ड्रॉ पद्धतीने बक्षीस वाटप करण्यात आले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना एकनाथ अमृतकर यांनी सांगितले की, मॉल संस्कृती,ऑनलाईन व्यापार, क्विक कॉमर्स अशा स्पर्धांना तोंड देण्यासाठी नैराश्याच्या  गर्तेत न अडकता आपण आपल्या व्यापार पद्धतीत काही बदल करणे आवश्यक आहे.आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत केलेल्या कामाचा आढावा सादर  केला व नव्या कार्यकरिणीसही पूर्ण सहकार्य करू असे सांगितले 

नवनिर्वाचितअध्यक्ष संतोष राय यांनी अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व उपस्थित सदस्यांचे आभार व्यक्त करतांना नवी कार्यकारिणी अधिक जोमाने  कार्य करेल असे आश्वासन  दिले. सभेसाठी संघटनेच्या  अनेक आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

Comments

No comments yet.