नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केलेल्या या उपक्रमाची राज्यभर चर्चा... असं काय आहे त्यात?

Share:
Main Image
Last updated: 29-Dec-2025

नंदुरबार, (प्रतिनिधी) २९ डिसेंबर - विद्यार्थ्यांच्या करिअर प्रवासाला योग्य दिशा मिळावी, त्यांच्या क्षमतांना वाव मिळावा आणि भविष्यातील संधींबाबत त्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने 'प्रकाशवाटा' उपक्रमांतर्गत ‘Weekly Career Campaign’ ही नवी उपक्रममालिका सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेद्वारे दर आठवड्याला विद्यार्थ्यांना एका नव्या व महत्त्वाच्या करिअर संधीची ओळख करून दिली जाणार आहे. त्या संधीचे स्वरूप काय आहे, ती संधी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे, तसेच त्या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी कोणता मार्ग अवलंबावा लागतो — हे सर्व सोप्या, समजण्यास सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार आहे.

या आठवड्याची करिअर संधी : IISER (संशोधन क्षेत्र)

'Weekly Career Campaign' च्या या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठित संधी — IISER (Indian Institutes of Science Education and Research) याविषयी माहिती देण्यात येत आहे.

IISER ही संस्था विज्ञान शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. येथे प्रवेशासाठी असलेली परीक्षा, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम, तसेच JEE किंवा NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IISER ही संधी कशी पूरक ठरू शकते, याची सविस्तर आणि मार्गदर्शक माहिती पुढील व्हिडिओद्वारे देण्यात आली आहे.

IISER परीक्षा आणि तयारी कशी करावी:

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त संशोधन, वैज्ञानिक विचार आणि नवकल्पनांच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Comments

No comments yet.