अॅप्‍पल डेज सेलची सुरूवात.... अशा आहेत भन्नाट ऑफर्स... या तारखेपर्यंत घ्या लाभ....

Share:
Main Image
Last updated: 28-Dec-2025

 

मुंबई, (प्रतिनिधी) २८ डिसेंबर २०२५ :- विजय सेल्‍स या भारतातील प्रमुख इलेक्‍ट्रॉनिक्‍स ओम्‍नी-चॅनेल रिटेल साखळीने आपल्‍या १६० हून अधिक रिटेल आऊटलेट्समध्‍ये, तसेच ऑनलाइन वेबसाइट www.vijaysales.com वर २८ डिसेंबर २०२५ पासून बहुप्रतिक्षित अॅप्‍पल डेज सेल सुरू केला आहे.  हा सेल ४ जानेवारी २०२६ रोजी समाप्‍त होईल. हा सेल प्रत्‍येक अॅप्‍पलप्रेमीला अॅप्‍पलच्‍या प्रीमियम लाइनअपवर आकर्षक किमती देतो, ज्‍यामध्‍ये नवीन आयफोन्‍स, मॅकबुक्‍स, आयपॅड्स, वॉचेस्, एअरपॉड्स अशा सर्वोत्तम डिवाईसेसचा समावेश आहे.

विजय सेल्‍सचे संचालक श्री. निलेश गुप्‍ता म्‍हणाले, ''आम्‍हाला पुन्‍हा एकदा अॅप्‍पल डेज सेल घेऊन येण्‍याचा आनंद होत आहे. सूट व्‍यतिरिक्‍त हा सेल अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे साजरीकरण आहे, ज्‍यामध्‍ये ग्राहकांना अविश्वसनीय मूल्‍य मिळते. अद्वितीय डिल्‍स व एक्‍स्‍चेंज बोनससह आम्‍ही अॅप्‍पलप्रेमींना त्‍यांचे डिवाईसेस अपग्रेड करण्‍याची आणि स्‍टाइलमध्‍ये नवीन वर्षाची सुरूवात करण्‍याची संधी देत आहोत.'' 

ग्राहकांसाठी या सेलला अधिक लाभदायी करत विजय सेल्‍स आयफोन १७ खरेदीवर ३,००० रूपयांचे मायव्‍हीएस रिवॉर्ड्स लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स देत आहे. स्‍टोअरमध्‍ये पुढील खरेदीवर अधिक सूटचा आनंद घेण्‍यासाठी हे पॉइण्‍ट्स रिडिम करता येऊ शकतात. अद्वितीय डिल्‍स आणि विशेष बँक ऑफर्ससह विजय सेल्‍सचा अॅप्‍पल डेज सेल अत्‍याधुनिक अॅप्‍पल तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या ग्राहकांसाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आला आहे. तुम्‍हाला नवीन आयफोन एअर, आयफोन १७, आयफोन १७ प्रो किंवा आयफोन १७ प्रो मॅक्‍स खरेदी करायचा असेल तर मोठी झेप घेण्‍याची हीच वेळ आहे. प्रगत वैशिष्‍ट्ये, अद्वितीय कार्यक्षमता आणि आकर्षक डिझाइन्‍स असलेले हे प्रमुख मॉडेल्‍स स्‍मार्टफोनच्‍या कार्यक्षमतेला नव्‍या उंचीवर घेऊन जातात.

पूर्वीचे मॉडेल्‍स खरेदी करण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍यांसाठी आयफोन १६, आयफोन १६ प्‍लस, आयफोन १६ई, आयफोन १५ देखील अत्‍यंत आकर्षक दरांमध्‍ये उपलब्‍ध आहेत. अपवादात्‍मक कार्यक्षमता आणि आकर्षक दरांसह हे मॉडेल्‍स अपग्रेडिंग किंवा गिफ्टिंगसाठी परिपूर्ण आहेत. आयफोन्‍स, मॅकबुक्‍स, वॉचेस् इत्‍यादींवर आकर्षक सूट व्‍यतिरिक्‍त अॅप्‍पल डेज सेलदरम्‍यान अॅप्‍पल अॅक्‍सेसरीज, जसे चार्जर्स, केबल्‍स, पेन्सिल्‍स आणि केसेस् देखील आकर्षक दरांमध्‍ये उपलब्‍ध आहेत.

अधिक उत्‍साहाची भर करत निवडक अॅप्‍पल डिवाईसेसचे प्रात्‍यक्षिक व ओपन युनिट्स स्‍टोअर्समध्‍ये, तसेच www.vijaysales.com वर विशेष किमतींमध्‍ये उपलब्‍ध आहेत. हे स्‍पेशल युनिट्स मर्यादित प्रमाणात उपलब्‍ध आहेत आणि पुरवठा असेपर्यंत 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्‍य' या तत्त्वावर देण्‍यात येतील. स्‍टोअर्समध्‍ये अॅप्‍पल केअर+ किंवा प्रोटेक्‍ट+ सह अॅप्‍पल कार सर्विसेसचा आनंद घेत नवीन खरेदी केलेल्‍या अॅप्‍पल डिवाईसेसचे संरक्षण करा, जेथे विजय सेल्‍स अॅप्‍पल डिवाईसेसची खरेदी केल्‍यास प्रोटेक्‍ट+ योजनेवर जवळपास २० टक्‍के सूट देखील देत आहे. यामुळे नवीन खरेदी केलेले डिवाईसेस सुरक्षित राहण्‍याची खात्री मिळेल. 

अॅप्‍पल डिवाईसेस खरेदीला अधिक लाभदायी करण्‍यासाठी आयसीआयसीआय व इतर निवडक बँकेचे कार्डधारक त्‍यांच्‍या खरेदींवर जवळपास १०,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. अधिक उत्‍साहाची बाब म्हणजे विजय सेल्‍स ग्राहकांना विजय सेल्‍स स्‍टोअर्समध्‍ये आणि vijaysales.com वर जवळपास १०,००० रूपयांचा एक्‍स्‍चेंज बोनस देत आहे. विजय सेल्‍ससह खरेदी करण्‍याचा आणखी एक फायदा म्‍हणजे मायव्‍हीएस लॉयल्‍टी प्रोग्राम, जो ग्राहकांना स्‍टोअर्समध्‍ये व ईकॉमर्स वेबसाइटवर खरेदीसाठी ०.७५ टक्‍के लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स देतो. प्रत्‍येक मिळवलेल्‍या पॉइण्‍टचे मूल्‍य स्‍टोअर्समध्‍ये रिडम्‍प्‍शनच्‍या वेळी एक रूपया आहे.    

Comments

No comments yet.