आडगावला घरफोडी, मखमलाबादला चेन स्नॅचिंग... नाशकात चोरटे सुसाट...

Share:
Last updated: 28-Dec-2025

नाशिक, (प्रतिनिधी) २८ डिसेंबर - आडगावनाका भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात तीन लाखाच्या रोकडसह सोन्याच्या बिस्कीटचा समावेश असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरजितसिंग हरभजनसिंग बनवेत (रा.सर्वेश अपा. अपोलो हॉस्पिटल समोर स्वामी नारायण नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बनवेत कुटूंबिय बुधवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास देवदर्शनानिमित्त पंचवटीतील गुरूद्वार येथे गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्याच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली तीन लाखाची रोकड व सोन्याचे बिस्कीट असा सुमारे साडे तीन लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पंचमुख करीत आहेत.

नाशिक : रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे सव्वा लाख रूपये किमतीचे मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना मखमलाबाद रोडवरील महालक्ष्मीनगर भागात घडली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा मच्छींद्र चांगले (रा.मिलींद किराणा जवळ, महालक्ष्मीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चांगले या शुक्रवारी (दि.२६) जेवण आटोपून रात्रीच्या वेळी नेहमी प्रमाणे परिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. किराणा दुकानासमोरून त्या जात असतांना रॉंग साईडने डबलसिट आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले तपास उपनिरीक्षक बळवंत गावित करीत आहेत.

Comments

No comments yet.