टाटा सिएरा कारचे धमाकेदार पुनरागमन... पहिल्या दिवशी बुक झाल्या इतक्या हजार कार...

Share:
Main Image
Last updated: 26-Dec-2025

मुंबई, (प्रतिनिधी) २६ डिसेंबर - आयकॉनिक टाटा सिएराने धमाकेदार पुनरागन केले आहे, जेथे भारतातील ऑटोमोटिव्‍हप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. अधिकृतरित्‍या बुकिंगला सुरू झाल्‍याच्‍या पहिल्‍याच दिवशी सिएराने ग्राहक उत्‍साह व विश्वासासाठी नवीन मापदंड स्‍थापित केला आहे, जेथे ७०,००० हून अधिक बुकिंग्‍ज झाले आहेत आणि आणखी १.३५ लाख ग्राहक त्‍यांची पसंती व्‍यक्‍त करण्‍यासोबत औपचारिकपणे बुकिंग करत आहेत. या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादामधून भारतातील ग्राहकांमध्‍ये प्रीमियम मिड-एसयूव्‍ही म्‍हणून सिएराचा प्रख्‍यात दर्जा आणि लोकप्रियता दिसून येते.

या बुकिंग टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ''आम्‍ही उत्‍स्‍फूर्त प्रतिसादासाठी ग्राहकांचे आभार व्‍यक्‍त करतो, ज्‍यामधून टाटा सिएराचा प्रतिष्ठित दर्जा दिसून येतो. नियमांना नव्‍या उंचीवर नेण्‍याचा आपला वारसा कायम राखत सिएरा प्रीमियम मिड-एसयूव्‍ही या नवीन श्रेणीमध्‍ये अग्रस्‍थानी आहे. ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षा जाणून घेत या मध्यम आकाराच्‍या एसयूव्‍हीला नवीन लुक देण्‍यात आला आहे. एैसपैस जागा, आरामदायीपणा, लक्‍झरी, सुरक्षितता व दैनंदिन उपयुक्‍तता अशा प्रत्‍येक पैलूला अधिक दृढ करत सिएराने श्रेणीला पूर्णत: नवीन उंचीवर नेले आहे. सिएरा वेईकलपेक्षा अधिक असून प्रगती, व्‍यक्तिमत्त्व आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे.''

२५ नोव्‍हेंबर २०२५ रोजी टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍सने लाँच केलेली ऑल-न्‍यू टाटा सिएरा प्रतिष्ठित वेईकलचे नवीन व्‍हर्जन आहे, जिने तीन दशकांपासून महत्त्वाकांक्षा, ओळख व आठवणींना आकार दिला आहे. नवीन युगासाठी पुन्‍हा बारकाईने डिझाइन करण्‍यात आलेल्‍या सिएराने आपला दिग्‍गज वारसा व विशिष्‍ट डीएनए कायम ठेवला आहे, तसेच वेईकलमध्‍ये अत्‍याधुनिक बदल करण्‍यात आले आहेत. ही वेईकल यश, व्‍यक्तिमत्त्वाचे प्रबळ प्रतीक, शोधाचा उत्‍साह असण्‍यासोबत एस्‍केप मेडिकोअरसाठी आवाहन करते आणि अद्वितीय ड्रायव्हिंगचा आनंद देते. तीन प्रगत पॉवरट्रेन्‍स १.५ लिटर क्रियोजेट डिझेल, १.५ लिटर टीजीडीआय हायपेरियन पेट्रोल आणि १.५ लिटर एनए रेव्‍होट्रॉन पेट्रोलमध्‍ये उपलब्‍ध असलेली सिएरा विविध ड्रायव्हिंग स्थितींमध्‍ये सुलभ, आत्‍मविश्वासपूर्ण कार्यक्षमता देते.

Comments

No comments yet.