पोको सी८५ ५जी आकर्षक किमतीत उपलब्ध... अशा आहेत जबरदस्त ऑफर्स...

Share:
Main Image
Last updated: 25-Dec-2025

मुंबई (प्रतिनिधी), २५ डिसेंबर - पोको या भारतातील सर्वात विश्वसनीय ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने फक्‍त फ्लिपकार्टवर नवीन पोको सी८५ ५जी च्‍या फर्स्‍ट सेलला सुरूवात केली आहे. सर्वोत्तम बॅटरी अनुभवासाठी पोको सी८५ ५जी मध्‍ये ६००० एमएएच बॅटरी आहे, जी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहते. ३३ वॅट फास्‍ट चार्जिंगसह स्‍मार्टफोन फक्‍त २८ मिनिटांमध्‍ये ५० टक्‍के चार्ज होऊ शकतो. १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंग डिवाईसला पोर्टेबल पॉवर बँक बनवते, ज्‍यासह मोबाइल्‍स, टीडब्‍ल्‍यूएस इअरबड्स, स्‍मार्टवॉचेस् आणि इतर ऍक्सेसरीज चार्ज करता येऊ शकतात. हा पॉवर-पॅक स्‍मार्टफोन १२,००० रूपयांपेक्षा कमी किमतीच्‍या डिवाईसेस श्रेणीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करतो.

पोको सी८५ ५जी सह तुम्‍ही तुमच्‍या स्‍टाइलमध्‍ये सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता. या स्‍मार्टफोनमध्‍ये स्‍लीक, आधुनिक डिझाइनसह क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी आणि प्रीमियम ड्युअल-टोन फिनिशिंग आहे. हा स्‍मार्टफोन मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पॉवर ब्‍लॅक या रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. उच्‍च कार्यक्षम मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० चिपसेटची शक्‍ती असलेला हा डिवाईस गेमिंगपासून मल्‍टीटास्किंगपर्यंत प्रत्‍येक गोष्‍टीसाठी अत्‍यंत सुलभ, विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो. तसेच, ५० मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा सेटअप महत्त्वपूर्ण क्षण सुस्‍पष्‍टपणे कॅप्‍चर होण्‍याची खात्री देते. 

अद्वितीय लाँच किमतीसह १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून केवळ फ्लिपकार्टवर पोको सी८५ च्‍या विक्रीला सुरूवात झाली. सुरूवातीची किंमत ४ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १०,९९९ रूपये*, ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरएिण्‍टसाठी ११,९९९ रूपये* आणि ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १३,४९९ रूपये* आहे. लाँच ऑफरचा भाग म्‍हणून ग्राहक एचडीएफसी, आयसीआयसीआय किंवा एसबीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्सचा वापर करत १,००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटचा आनंद घेऊ शकतात किंवा चांगल्या डिवाईसेसवर १,००० रूपयांच्‍या एक्‍स्‍चेंज बोनसचा अवलंब करू शकतात. तसेच, क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर ३ महिने नो-कॉस्‍ट ईएमआय उपलब्‍ध आहे.   

पोको सी८५ ५जी हा असा स्मार्टफोन आहे जो उत्कृष्ट बॅटरी लाइफ, आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्स यांचा परिपूर्ण संगम साधतो. यामध्ये ६००० एमएएच क्षमतेची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली असून ती एका चार्जवर दोन दिवसांहून अधिक काळ सहज वापर करता येईल इतकी सक्षम आहे. यासोबतच ३३ वॅट फास्ट चार्जिंग आणि अत्यंत उपयुक्त १० वॅट वायर्ड रिव्हर्स चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. डिझाइनच्या बाबतीत, प्रीमियम फील देणारा क्वॉड-कर्व्ह्ड बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी, ड्युअल-टोन फिनिश आणि वेगळा उठून दिसणारा कॅमेरा डेको यामुळे हा फोन सेगमेंटमध्ये खास ठरतो आणि हातात घेतल्यावर उत्तम ग्रिप देतो.

सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच डिस्प्लेवर १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आला असून त्यामुळे स्क्रॉलिंग, स्वाइपिंग, गेमिंग आणि मनोरंजनाचा अनुभव अत्यंत स्मूथ व आनंददायी होतो. मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा डिव्हाइस ४.५ लाखांहून अधिक AnTuTu स्कोअर मिळवून उत्कृष्ट कार्यक्षमता प्रदान करतो. पोको सी८५ ५जी अँड्रॉईड १५ वर आधारित हायपरओएस २.२ सह आउट ऑफ द बॉक्स उपलब्ध असून, सेगमेंटमधील सर्वोत्तम सॉफ्टवेअर कटिबद्धतेअंतर्गत २ अँड्रॉईड अपग्रेड्स आणि ४ वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देण्यात येतात. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत हा स्मार्टफोन अधिक शक्तिशाली बॅटरी, मोठा व आकर्षक डिस्प्ले आणि प्रीमियम क्वॉड-कर्व्ह्ड बॅक डिझाइनसह मोठी झेप घेतो, तसेच हातात सहज बसणारा आहे. ट्रेंडी पण कार्यक्षम डिव्हाइस शोधणाऱ्या तरुण आणि उत्साही वापरकर्त्यांसाठी खास डिझाइन करण्यात आलेला पोको सी८५ ५जी सध्या फक्त फ्लिपकार्टवर पहिल्या सेलच्या खास ऑफर्ससह उपलब्ध आहे—म्हणून ही संधी हातातून जाऊ देऊ नका.

Comments

No comments yet.