पुणे, (प्रतिनिधी) २४ डिसेंबर - नगर परिषदा आणि नगर पालिकांच्या निवडणुकांनंतर सर्वच राजकीय पक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील यासाठी जोमाने तयारी सुरू केली असून ज्या ठिकाणी पक्षाचा दबदबा आहे, त्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. काही महापालिकांमध्ये अन्य राजकीय पक्षांशी युतीसंदर्भात चर्चा सुरू आहे. अशातच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रभारींची नावे जाहीर केली आहेत. यात मुंबईची जबाबदारी रोहित पवार तर पुण्याची जबाबदारी खा. सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली आहे.
कोकण विभाग
बृहन्मुंबई- रोहितदादा पवार
ठाणे- डॉ. जितेंद्र आव्हाड
नवी मुंबई- शशिकांत शिंदे
पनवेल- शशिकांत शिंदे
उल्हासनगर- जितेंद्र आव्हाड
कल्याण डोंबिवली- बाळ्यामामा म्हात्रे
भिवंडी निजामपूर- बाळ्यामामा म्हात्रे
मीरा भाईंदर- डॉ. जितेंद्र आव्हाड
वसई विरार-सुनिल भुसारा
नाशिक विभाग
नाशिक- सुनील भुसारा
अहिल्यानगर-निलेश लंके
जळगाव-संतोष दौधरी
धुळे-प्राजक्त तनपुरे
मालेगाव- भास्कर भगरे
पुणे विभाग
पुणे- सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय कार्याध्यक्षा
पिंपरी चिंचवड- डॉ. अमोल कोल्हे आणि रोहितदादा पवार
सोलापूर- धैर्यशील पाटील
कोल्हापूर- हर्षवर्धन पाटील
सांगली - मिरज-कुपवाड- जयंत पाटील
इचलकरंजी- बाळासाहेब पाटील
मराठवाडा-
छ. संभाजीनगर- बजरंग सोनवणे
नांदेड-वाघाळा-जयप्रकाश दांडेगावकर
परभणी- फौजिया खान
जालना- राजेश टोपे
लातूर- विनायक पाटील
विदर्भ- अमरावती विभाग
अमरावती- रमेश बंग
अकोला- राजेंद्र शिंगणे
नागपूर विभाग
नागपूर- अनिल देशमुख
चंद्रपूर- अमर काळे